पश्चिम विधानसभा मतदार संघात वर्चस्वाची लढाई

Foto

पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गड हा विद्यमान शिवसेना आमदार यांनी राखलेला आहे. गेली दोन टर्म आमदार शिरसाट यांनी या मतदार संघाचे नेतृत्व करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूकतीत आमदार संजय शिरसाट यांना टक्कर देण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत. शिवसेनेचा हा गड ढासळवण्यासाठी भाजपने या मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले असून भाजप सर्व शक्ति पणाला लावत आहे. पश्चिम मतदार संघातून एकट्या भाजप पक्षाकडून तब्बल सहाहून अधिक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इछुक असून या मतदार संघात आपली वर्णी लागावी आणि विधानसभचे तिकीट मिळावे यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावल्या जात आहे. इछुक उमेदवारांमध्ये भाजप कडून राजू शिंदे, जालिंदर शेंडंगे, बाळासाहेब गायकवाड, पंकज भारसाखळेउत्तम अंभोरेआणि चंद्रकांत हिवराळेतर कॉंग्रेसकडून साहेबराव बनकरडॉ. जितेंद्र देहाडेराहुल सावंतपवन डोंगरेबाबा तायडेभारिप तथा वंचित बहुजन आघाडीकडुन अमित भुईगळअरुण बोर्डे यांची नावे चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी आतापासूनच सर्व पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. पश्‍चिम विधानसभा मतदार संघ हा अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरीभागासह ग्रामीण भागाने जोडलेल्या या मतदारसंघात सर्वच पक्षांकडे इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी दिसते. अशात नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने शहरात सभा घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे वंचित आघाडीची उमेदवारी कोण मिळवणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. 

पुढच्या वर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणुक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांनी सुरु केली आहे. वरील सर्व  पक्षानी लोकसभा मतदार संघातील बुथ वाईज बांधणी केली आहे तर काही पक्ष बांधणी करीत आहेत. लोकसभा मतदार संघाचा आवाका मोठा असल्याने इच्छुकांची संख्या मर्यादित आहे. पण आपल्याच पक्षाचा खासदार निवडुन यावा यासाठी सर्व राजकीय पक्ष लोकसभेनंतर होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षात जे इच्छुक आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लावून तिकिट देण्याचे गाजर दाखवित आहेत. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक  इच्छुक भावी आमदारांची गर्दी सध्या तरी पश्‍चिम मतदार संघात दिसून येते.

 इच्छुक उमेदवार सकाळीच मतदारांच्या दारात

पश्चिम विधानसभा निवडणूकीत आपला विजय निश्चित असल्याचे मानणार्‍या इच्छुक उमेदवारांनी आपला भर नागरीकांच्या भेटीगाठीवर दिला असून अनेकजण सकाळीच हा पश्चिम मतदार संघ पिंजुन काढत आहेत. सकाळीच नागरीकांच्या दारावर जाऊन “चाय पे चर्चा” भाजपच्या टिकीटावर लढु इछिणार्‍या उमेदवारांनी सुरू केली आहे.

आंबेडकरी चळवळ आणि दलित संघटनांचा उमेदवारांना फायदा

पश्चिम मतदार संघ हा मागासवर्गासाठी राखीव आहे. या मतदार संघात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राजकारण्यांचा दलित मतांवर डोळा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधनसभेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी आत्त्तापासूनच सर्व पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. पश्चिम विधनसभा मतदार संघ हा अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरी भागासह ग्रामीण भागासह जोडलेल्या या मतदार संघत सर्वच पक्षंकडे इच्छुकांची मोठी गर्दी या मतदार संघात दिसून येते २०१४ आणि२००९ मध्ये शिवसेनेतर्फे आ. संजय शिरसाट हे या मतदार संघातून निवडून आले. याही वेळेस शिवसेनेतर्फे शिरसाट यांचेच नावक्रमांक एकवर बोलल्या जातेमात्र युतीच्या भांडणात या मतदार संघाची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत. २०१४ मध्ये भाजपातर्फे मधुकर सावंत यांनी संजय शिरसाट यांच्याशी चांगली लढत दिली. संजय शिरसाट हे थोड्या मताच्या फरकाने विजयी झाले होते. यावेळी ही भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. सात ते आठ जण उमेदवारीसाठी इच्छुक आहे. काँग्रेस पक्षाकडून ही अनेकजण निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. या मतदार संघात हिन्दु मतांची लक्षणीय आहे. त्यापाठोपाठ दलित आणि मुस्लिमांची मते आहेत. गत निवडणुकीत एमआयएम पक्षाने शहरातील राजकारणात प्रवेश करुन मुस्लिम वसाहतीमध्ये चांगलाच शिरकाव केला. शहरातील पूर्वपश्‍चिम आणि मध्य मतदार संघात मुस्लिमांच्या मतावर एमआयएमचा मध्य विधानसभा मतदार संघातून एक उमेदवार विजयी झाला. तर पूर्व मधून डॉ. गफ्फार कादरी यांचा निसटता पराभव झाला.  पश्‍चिम मध्येही एमआयएमकडून गंगाधर गाडे यांनी निवडणुक लढविली ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. काँग्रेसला मात्र चौथ्या क्रमांकावर राहावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एमआयएमने मुस्लिमांसोबतच दलितांना सोबत घेण्याचे धोरण स्विकारुन २०१५  मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दलितांना ही उमेदवारी दिली. एमआयएमकडून २५नगरसेवक निवडून आले त्यापैकी पाच नगरसेवक दलित समाजाचे निवडून आले. तेव्हापासून दलित-मुस्लिम आघाडीचे गणित एमआयएमचे अध्यक्ष खा. असद्दोद्यीन ओवेसी यांच्या डोक्यात होते. अशातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी स्थापन केली आणि वंचित आघाडीची नुकतीच सभा झाली. ही आघाडी निवडणुकीची समीकरणे बदलणार असे बोलले जात आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker